बोरगाव येथील धैर्यशीलराव पवार व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न S बाळकडू : जय गांगुर्डे पोवाडा ,एकांकिका,कोळी गीत,रिमेक्स गाणे इत्यादी

(नाशिक) : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील धैर्यशीलराव पवार व कनिष्ठ महाविद्यालय बोरगाव येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते., प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण दडलेले असतात ते जनते समोर मांडले जावे यासाठी वार्षिक स्नेह संमेलनामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा मध्ये बक्षिसे मिळवणारे विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात असे प्रतिपादन प्राचार्य संजय वाघ यांनी केले. __ या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ चेक पोस्ट चे सचिन बोधले, सरपंच कल्पना भरसट, अशोक गवळी, चंदर भोये, संतोष भोये,रघुनाथ भोये, भास्कर भोये, आनंद पडवळ, लक्ष्मण बागुल, जय गांगुर्डे ,माजी सरपंच भाऊराव राऊत ,काळु बागुल, का.का.गायकवाड ,चंद्रकांत भरसट आदी उपस्थित होते . सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन संपन्न पोवाडा ,एकांकिका,कोळी गीत,रिमेक्स गाणे इत्यादी कार्यक्रम सादर करून पालकांचे व प्रमुख पाहण्यांची मने जिंकली. सूत्रसंचालन केद चव्हाण यांनी केले धनंजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी पर्यवेक्षक विलास जाधव, भाऊराव राऊत, सावळीराम गायकवाड, साई खिल्लारी, पार्वती गावित, संदीप चौधरी, गोरख भोई, राजेंद्र सूर्यवंशी, सुभाष सोनवणे ,अश्विन कस्तुरे, सचिन जाधव, रमेश जाधव, मनीषा सावकार, रावसाहेब सूर्यवंशी, केदु चव्हाण, धनंजय पाटील, पालक व सुरगाणा तालुका पत्रकार संघाचे सदस्य व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.